.


कास पठार हे दुर्मिळ वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे परंतू त्याचबरोबर विस्तीर्ण अशा कास पठारावर अनेक प्राचीन निसर्गरम्य स्थळे आहेत हे अनुभवण्यासाठी,निसर्गाची विविध रुपे पाहण्यासाठी कास पठारला भेट द्या. प्रवेश फी फक्त २०/- सूचना- कास पठारवरील पॉईंट्समध्ये जास्त अंतर असल्याने पर्यटकाने साधारणत: ८ किमी चालणे आवश्यक आहे.

9.30 पठारावर हजर राहणे. 9.30 ते 10.00 तिकीट व गाइड. 10.00 सुरुवात.

1) स्वयंभू गणेश 2) सज्जनगड व्हिव्यू पॅाइंट 3) हंडा घागर 4) जंगल व्हिव्यू 5) दगडी कमान ( जेवणाची वेळ ) 6) कण्हेर/ वेण्णा दर्शन पॅाइंट 7) कुमुदिनी

5.00 सांगता

नियमावली व सूचना

1)या सर्व पाँईंट्सला चालत जावे लागेल. 2) सोबत जेवण आणले तरी चालेल. 3) पायामध्ये शूज असणे आवश्यक आहे. 4) दहा वर्षावरील मुलांना प्रवेश मिळेल. 5) सोबत येताना दोन पाण्याच्या बाटल्या घेऊ यावे. 6) एन्ट्री फी 20 रुपये आहे.




Feature-img

या ठिकाणी प्राचीन काळापासून गणपतीचा आकार असलेली दगडामध्ये स्वयंभू मुर्ती दिसून येते. तसेच या मुर्तीची जुन्या अनुभवी लोकांकडून माहिती घेतली.


Feature-img

या ठिकाणाहून सज्जनगड किल्ला तसेच उरमोडी धरण दिसते, उरमोडी या नदीचा उगम कास तलाव परिसरातून झाला आहे. उरमोडी धरण १९९७ साली बांधण्यात आले. या ठिकाणाहून सूर्योदय अतिशय सुंदर दिसतो.


Feature-img

कास पठार परिसरातील नैसर्गिकरित्या असलेल्या या ठिकाणाला जुनी अनुभवी लोक हंडा घागर या नावाने ओळखतात. तसेच या ठिकाणी पायांच्या आकाराचे ठसे दिसून येतात. येथून घाटाई वनराई (देवराई) दिसून येते.


Feature-img

येथून कास पठाराच्या आजूबाजूचे जंगल पाहावयास मिळते. तसेच कास धरणाची भिंत पाहावयास मिळते.



Feature-img

ही कमान पुरातन काळातील असून नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे. या ठिकाणाला मंडप या नावाने ओळखले जाते.या कमानीच्या बाजूला एक छोट्या आकाराची कमान व गुफा आढळते. येथून कास तलाव व त्याच्या आजूबाजूचे जंगल दिसते. हे ठिकाणाहून सुर्यास्ताचा नजारा अतिशय सुंदर दिसतो.

.

Feature-img

या ठिकाणाहून मेढा परिसरातील कण्हेर नदी दिसते. मेरुलिंगपर्वत रांगाही येथून दिसतात.


Feature-img

शिवकालीन राजमार्गाने २ कि.मी आत गेल्यावर कुमुदिनी तलावाच्या समोरील बाजूस ही गुफा आहे. हे वन्यप्राण्यांच्या निवाऱ्याचे ठिकाण आहे.